सिरपली शालेय समिती अध्यक्षपदी संतोष जाधव उपाध्यक्षपदी राजु तपासकर यांची निवड

हिमायतनगर प्रतिनिधी/ सिरपली शालेय शिक्षण समितीची निवड करण्यात आली असुन अध्यक्षपदी संतोष जाधव तर उपाध्यक्ष पदी राजु तपासकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 
हिमायतनगर तालुक्यातील सिरपली जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीची पुनर्रचना  करण्यासाठी पालक सभा घेण्यात आली.उपस्थित पालकांनी शालेय व्यवस्थापन सिरपली अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड केली आहे. अध्यक्षपदी संतोष जाधव, उपाध्यक्ष राजु तपासकर, सदस्य प्रविण कदम, सुदर्शन जाधव, गजानन तिरमलवार, सौ. काचंन माने, आश्विनी जाधव, कल्पना शिरफुले, सिमा यशवंतकर, सागरबाई तपासकर, सुदर्शन पवार आदींची निवड करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पालकांची उपस्थिती होती. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.