सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यावर आता होणार पोलीस कार्यवाही - पो.निरीक्षक भुसनूर

हिमायतनग प्रतिनिधी/ शहरातील पोलीस स्टेशन परिसरात दिनांक 29 जुलै 2022 च्या रात्री दहाच्या सुमारास परमेश्वर सुभाष खानजोडे वय 22 राहणार एकबा येथील युवक दारूच्या धुंद नशेत पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घालत असल्याचे आढळून येताच हिमायतनगर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस हवालदार कोमल कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 85 (1) प्रमाणे आरोपी विरुद्ध हिमायतनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता गावातील सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही दारूड्यांनी गोंधळ घातल्यास पोलीस कार्यवाही होणार असल्याचे पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी सांगितले आहे. 

हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात दारूड्यांनी धुमाकूळ घातला असुन सार्वजनिक ठिकाणी मंदिर, शाळा, ग्रामपंचायत, यासह गावातील सार्वजनिक ठिकाणी दारूड्यांनी आपली टिम तयार करून गोंधळ घालण्याचा प्रकार वाढला असून अशा दारूड्यांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक भुसनूर यांनी केले आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी कुठलाही दारुडा गोंधळ घालून, सार्वजनिक ठिकानी शातता भंग करताना आढळून आल्यास किंवा गैरवर्तन करताना दिसल्यास व पोलीस स्टेशन मध्ये येताना कुणी पण दारू पिऊन बोलतांना आढळून आला तर त्याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले आहे. असाच प्रकार दि ,29 जुलै रोजी रात्री 10:30 च्या सुमारास तालुक्यातील मौजे एकंबा येथील 22 वर्षीय आरोपी परमेश्वर सुभाष खानजोडे यांनी दारू च्या नशेत पोलीस स्टेशन मध्ये येऊन गोंधळ घातल्या मुळे महिला पोलीस हवालदार कोमल कांगणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु. र. न 177 कलम महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 85 (1) प्रमाणे आरोपी विरुद्ध हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक भुसनुर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिट जमादार अशोक सिंगनवाड हे करीत आहेत



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.