आगामी काळात होणाऱ्या सर्व निवडणूका भाजपा पुर्ण ताकदीनीशी लढविणार-आ.राम पाटील रातोळीकर

हिमायतनगर प्रतिनिधी/हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीसह जिल्हा परिषद, व पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. आगामी काळात होवू घातलेल्या सर्वच निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनीशी उतरून जिंकणार आहे. असे मत आमदार राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केले. 

हिमायतनगर येथे भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या निवासस्थानी आगामी  
 नगरपंचायत, जी.प. निवडणुकीच्या संदर्भाने आमदार रातोळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची आढावा बैठक संपन्न झाली. या वेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आमदार रातोळीकर म्हणाले की, मागील ३ वर्षाच्या काळात महाभकास आघाडी सरकारने विकासाचे तीनतेरा वाजवले आहे. केवळ भ्रष्टाचार करून आपला स्वार्थ कसा साधता येईल यावर लक्ष केंद्रित करून आघाडी सरकार चालविले. ते सरकार आता पायउतार होऊन शिवसेना शिंदे गट आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केले आहे. ईडी हि संस्था वेगळी आहे, त्याच्यात शासनाचा काही एक संबंध नाही... कर नाही तर डर कश्याला... ज्यांनी काही पाप केले असले घोटाळे केले.असले त्यां विषयी ईडी काम करते. ती संस्था वेगळी आमचा शासन वेगळं विनाकारण काहीतरी बोलायचं अशी अवस्था गेल्या तीन वर्षात आघाडी सरकारने चालविली होती. कुठलेही काम करताना केंद्राकडे बोट दाखवायचे आणि आपल्या मंत्र्याच्या मध्यातून वाझेसारखे अधिकारी नेमून वसुली करायचं असे काम आघाडी सरकारने केली असल्याची सडकून टीका विधानपरिषदेचे आ.राम पाटील रातोळीकर यांनी केली आहे. आगामी काळात होवू घातलेल्या निवडणूकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागावे. असे अवाहन केले आहे.

ते यावेळी अरुणभाऊ सुकलंकर, भाजप तालुकाध्यक्ष आशिष सकवान, जेष्ठ कार्यकर्ते किशनराव वानखेडे, सुधाकर पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, वामन मिराशे वडगावकर आदींसह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.