हिमायतनगर - हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका निवडणूक बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढवणार
फुले ,शाहू ,आंबेडकर ,अण्णाभाऊ मान्यवर कांशिरामजी यांच्या समता मुलक विचारांचा बहुजन समाज पार्टी हा पक्ष असून 85% बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी व समतामुलक समाज निर्माण करण्यासाठी बहुजन समाज पार्टी निवडणूक रिंगणात उतरणार आहे.
जातीवादी मानसिकतेच्या भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, यांच्या घराणेशाहीला हादरा देण्यासाठी बहन कुमारी मायावती यांच्या आदेशानुसार मनीष भाऊ कावळे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ,दिगंबर जी ढोले प्रदेश महासचिव., लक्ष्मण वायवळे जिल्हाध्यक्ष नांदेड उत्तर. यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढवणार असल्याचे बसपा जिल्हा महासचिव गणेश राऊत डोल्हारीकर यांनी स्पष्ट केले आहे
