प्रतिनिधी दिनांक 29आगामी सार्वत्रिक जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आष्टी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण ओबीसीसाठी राखीव झाल्यामुळे अनेक इच्छुकाची हिरमोड झाली आहे परंतु मागील अनेक दिवसापासून मोठ्या उत्साहाने सामाजिक काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, नव्यानेच भाजपात प्रवेश केलेले भागवत देवसरकर यांना मात्र आशेचा किरण निर्माण झाला आहे, त्यांच्या पत्नी सौ. सोनाली देवसरकर यांच्याकडे ओबीसी कुणबी जातीचे प्रमाणपत्र असल्यामुळे ही निवडणूक लढवता येणार आहे आष्टी जिल्हा परिषद गट हा मराठा समाजाच जास्त मतदान असेलला गट आहे,सौ. सोनाली भागवत देवसरकर यांना जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे.
भागवत देवसरकर यांनी आष्टी जिल्हा परिषद गटात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवून अनेक लोकांची कामे केली आहेत, जिल्हा परिषद गटातील अनेक गावात मित्रमंडळी, सगे,सोयरे,नातेवाईक व कार्यकर्ता व काम करण्याच्या दांडगा अनुभव प्रशासनासोबत काम करण्याची हातोटी यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भागवत देवसरकर यांना आष्टी जिल्हा परिषद गटातील नागरीक संधी देतील यात काही शंका नाही, ओबीसी जातीचे प्रमाणपत्र भागवत देवसरकर यांच्या सौभाग्यवती सोनाली देवसरकर या विदर्भातील असल्यामुळे कुणबी जातीच त्यांनी जात प्रमाणपत्र काढून घेतल आहे,त्याचा फायदा आता आष्टी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यास निश्चित होणार आहे, येणाऱ्या काळात विजयाची जास्त संधी आहे.
