हिमायतनगर प्रतिनिधी(सोपान बोंपीलवार) गुरुवारी दुपारी उघडीप झाल्यामुळे शेतकरी शेतातील सोयाबीन, कापूस पिकांना खत टाकण्याच्या घाई गडबडीत होते परंतु दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक अतिमुसळधार पावसाच्या तडाख्यात टाकलेल्या खतासह पिके खरडून शेतातील माती देखील वाहून गेल्याचे विदारक चित्र दिसून आले आहे. प्रशासनाकडून अद्यापही शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत जाहीर झाली नाही पावसाचा जोर वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे,
हिमायतनगर तालुक्यातील सलग एका महिन्यात सलग तिसऱ्यांदा अतिमुसळधार पाऊस झाला . शेतकऱ्यांच्या पेरण्या केलेली पिके उगवली नाही तरी अतिवृष्टी मुळे सोयाबीन सह कापुस पिकांची दुबार पेरणी करावी लागली. शेतकऱ्यांनी अशेपोटी दुसऱ्यांदा पेरणी केली होती. पुन्हा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्या पावसाच्या पुरात पिके खरडून गेली. शेतकऱ्यांच्या शेतातील जमिनी उन्हाळ्यात दिसतात तशी परिस्थिती निर्माण झाली. दि. 28 जूलै रोजी सकाळी पावसाने उघडीप दिली असल्याने उमाटावरील जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकांना खत टाकले गुरुवारी दुपारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला या पावसाने टाकलेले खत वाहून गेले यात शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. हिमायतनगर तालुक्यात सर्वात जास्त अतिवृष्टी झाली परंतु शासनाकडून अद्यापही आर्थिक मदत जाहीर झाली नाही. शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून शेतकऱ्यांना शेतातील पिकांचे उत्पादन होण्याची अशा मावळली असुन बियाणांची परतफेड कशी करावी याची चिंता लागली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होते आहे.
