हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील तिन जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत गुरुवारी जाहीर झाली असून दोन्ही गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव तर एक गट अनुसूचित जाती पुरुषाकरीता आरक्षित झाला आहे.यामुळे अनेक इच्छुक पुरुषांचे स्वप्न भंगले आहे.
हिमायतनगर तालुक्यात दोन जिल्हा परिषद होत्या यावेळी एका गटाची संख्या वाढली असल्यामुळे तिन गट झाले आहेत. या तिन गटासाठी गुरुवारी दुपारी नांदेड जिल्हाधिकारी यांनी आरक्षण सोडत जाहीर केली आहे. दुधड-कामारी ह्या गटाचे आरक्षण अनुसूचित जाती( पुरुष) करिता आरक्षित आहे. तर सरसम गटाचे सर्वसाधारण (महिला )व सिरंजनी गटाचे आरक्षण देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटले आहे. यावेळी अनेक पुरुष इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, कोहळीकर गटाच्या इच्छुकांना आरक्षण सोडतीचा चांगलाच धक्का बसला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील दोन महिला निवडणूक आल्या होत्या यावेळी देखील दोन महिला एक पुरूष निवडणुकीत उतरणार असुन आता आरक्षण सोडत झाली आहे. परंतु शिवसेना, कांग्रेस,पक्षाची उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता लागून आहे.
पंचायत समिती च्या सहा गणाची आरक्षण सोडत जाहीर
हिमायतनगर तालुक्यातील पंचायत समितीच्या सहा गणाची आरक्षण सोडत गुरुवारी पंचायत समितीच्या कार्यालयात झाली.
मंगरूळ गण- ओबीसी (महिला)सिरंजनी गण- एस.टी. (महिला)सरसम गण - एस.सी. (महिला) पवना गण - सर्वसाधारण,कामारी गण - सर्वसाधारण,दुधड गण- सर्वसाधारण अशी आरक्षण सोडत झाली आहे. पंचायत समितीच्या आरक्षणामध्ये महिलांना संधी मिळणार आहे. त्यामुळे पक्षाची उमेदवारी कुणाला असणार ह्याची उत्सुकता लागून आहे. तर गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षण सोडती मधुन येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती मध्ये महिला राज दिसणार आहे. इच्छुक असणाऱ्या पुरुषांचे जि. प.सदस्य ,पं.स.सदस्य होण्याचे स्वप्न भंगले आहे.
