शिरोमणी ला संगीतमय श्रद्धांजली

हिमायतनगर प्रतिनिधी दि.6 फेब्रुवारी 2022: श्री माणिकप्रभू संगीत विद्यालय उमरी, जि.नांदेड येथील गुणी विद्यार्थिनी कु. शिरोमणी संपती होनशेट्टे, (13 वर्षे) बेलदरा येथील रहिवासी होती. महाशिवरात्रीला बळेगाव येथील यात्रेला गेली असता तिचा नदीत बुडून दुर्दैवी करुण अंत झाला. अतिशय गुणवान, हुशार सर्वांची लाडकी असलेली शिरोमणी अचानक निघून गेल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. 
         शिरोमणी च्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी संगीत विद्यालयात सलग आठ तास संगीत गायन, वादनातून श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये ओंकार साधना, अभंग, भक्तिगीते तबला वादन सादर करण्यात आले. 
    या कार्यक्रमात विद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे आयोजन संचालक श्री अनिल अप्पा, श्री अमित अप्पा उत्तरवार तसेच संगीत शिक्षक श्री प्रशांत बोंपिलवार यांनी केले श्री चोपडे सर यांनी सूत्रसंचालन केले. दिगंबर, ज्ञानेश्वर, कृष्णा यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.