हिमायतनगर प्रतिनिधी/- हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती निवड करण्यासाठी पालकांची बैठक घेण्यात आली सर्वानुमते शालेय समिती अध्यक्षपदी अनिल राचटकर तर उपाध्यक्षपदी राजू आंबेपवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .या निवडीबद्दल अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा शालेय शिक्षक व पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
वारंगटाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पालकांची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी अनिल राचटकर ,उपाध्यक्षपदी राजू आंबेपवाड यांचे नाव घोषित करण्यात आले व सर्वांनी नावाला अनुमोदन देउन केली .
यावेळी सरपंच दयाळगिर गिरी,पोलीस पाटील अवधूत कदम , मुख्याध्यापक खानसोळे , स्वामी ,डाकोरे,बालाजी आबेपवाड, दत्तात्रय चिंतलवाड, प्रकाश हाके ,शिवाजी कदम ,चाफाजी हाके विश्वंभर कानोटे , संघपाल प्रधान ,सेवक वामनगिरी ,माधव कानोटे, विजय हाटे ,पत्रकार दत्ता पुपलवाड ,राम चिंतलवाड,व गावकऱ्यांची उपस्थिती होती.
