हिमायतनगर प्रतिनिधी /हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रशासनाच्या वतीने कडे कोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरातील नगरपंचायत निवडणूक च्या उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे .निवडणूक देखील लागली असल्याने शहरातील वातावरण शांतता मय राहिले पाहिजे निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्बंधांचे सर्वांनी पालन करावे निवडणूक काळात शहरात गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी केले आहे .
हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळी सात वाजता पोलीस प्रशासनाच्या वतीने भागातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक अमोल भगत म्हणाले की शहरातील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रोग्राम सुरू झाला असून या निवडणुकात शहरातील वातावरण शांतताप्रिय असले पाहिजे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्बंधाचे कडेकोट पालन करावे कुठेही या निवडणुका काळात गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे या बैठकीसाठी हिमायतनगर शहरातील चौपाटी भागातील पदाधिकारी कार्यकर्ते व्यापारी उपस्थित होते.
