शहरातील नगरपंचायत सार्वत्रिक
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू झाली असली तरी तिसऱ्या दिवशी बुधवारी 12 नोव्हेंबर पर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार एस जी पठाण यांनी दिली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागणी केली असली तरी पक्षश्रेष्ठींकडून अद्यापही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारा बाबतीत गोपनीयता ठेवली असुन कांग्रेस, शिवसेना, महायुती, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण नगराध्यक्ष असणार याची उत्सुकता लागली असली मुख्य म्हणजे कांग्रेस पक्षाकडून कोण राहणार याकडे लक्ष लागून आहे.
हिमायतनगर शहरातील नगरपंचायत निवडणुक लागली असुन शहरात एकुण 17 वार्ड आहेत.या 17 वार्डातील सतरा उमेदवार हे नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत तर आठरावा उमेदवार हा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार आहे. गेल्या नगरपंचायत निवडणुकीत नगरसेवकातुन नगराध्यक्ष निवडला गेला होता परंतु यावेळी नगराध्यक्ष पदासाठी जनतेतून मतदान होणार आहे.या निवडणुकीत जनतेतून म्हणजेच 17 वार्डाततील जनतेसोबत संपर्क असणाराच नगराध्यक्ष निवडला जाणार आहे.त्यामुळे नगराध्यक्षासह नगरसेवकांना हि निवडणुक मोठी कसरतीची जाणार असल्याचे संकेत आहेत.
शहरात एकुण 17326 मतदार संख्या आहे यामध्ये स्त्री मतदार संख्या 8569 आहे तर पुरूष मतदार संख्या 8757 अशी आहे. कांग्रेस पक्षाकडून अनेक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत नगराध्यक्ष पदासाठी देखील अनेकांनी मागणी केली असली एकाच उमेदवारांना संधी मिळणार आहे.माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर हे शहरातील जनतेचे जनमत घेत आहेत.तर शिवसेना उबाठा गट, शिंदे शिवसेना,भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मात्र बाहेरून चाचपणी करताना दिसत आहेत.लोकसभा,विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची तर महायूती युती होती या निवडणुकीत महाविकास आघाडीची युती असणार नाही स्वबळावर लढवणार असल्याची माहिती आहे तर महायुतीची युती राहण्याचे संकेत आहेत.खा.नागेश पाटील आष्टीकर,विद्यमान आ.बाबुराव कदम कोहळीकर , माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर हे देखील लक्ष देऊन आहेत.त्यामुळे शहरातील नगरपंचायत निवडणुक मोठी चुरशीची होणार असून अनेक इच्छुक उमेदवारांना उमेदवारी नाकारल्याने त्यांना सांभाळण्यासाठी नेत्यांना कसोटी करावी लागणार आहे.त्यामुळे या निवडणुकीत कोण नगराध्यक्ष उमेदवार रिंगणात उतरणार याची उत्सुकता लागली आहे.
