हिमायतनगर प्रतिनिधी/-पालकमंत्री यांनी कलावंतांची निवड समिती गेल्या अनेक महिन्यापासून केली नसल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नांदेड जिल्ह्यातील कलावंतांना मानधनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे यामुळे तातडीने जिल्हाधिकारी यांनी निवड समिती करावी असे मागणी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे गुरुवर्य स्मृतीशेष एम.पी. भवरे कामारीकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था,बहुजन टायगर युवा फोर्स (सांस्कृतिक विभाग) महाराष्ट्र राज्य व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ च्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही येत्या ९ नोव्हेंबर रोजी रविवारी लोकपारंपारिक कलावंत,शाहीर मेळाव्याचे हिमायतनगर तालुक्यातील पोटा (बु.) येथे सरस्वती इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती व आपापली कला देखील सादर करून दाखविली या कलेबद्दल उपस्थितांनी कौतुक केले.आलेल्या कलाकारांचा माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सत्कार केला.या प्रसंगी बोलताना जवळगावकर म्हणाले की गेल्या अनेक महिन्यांपासून नांदेड जिल्ह्यात वृद्ध कलावंतांना मानधनापासून वंचित रहावे लागत आहे तर अनेकांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयात पडून आहेत कारण पालकमंत्री यांनी निवड समिती गठीत केली नसल्यामुळे ह्या ग्रामीण भागातील कलाकारांना वंचित रहावे लागत असुन तातडीने समिती गठीत करून वंचित कलावंताचे प्रस्ताव मंजूर करून न्याय देण्याची मागणी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यासपीठावर केली आहे यावेळी गजानन सुर्यवंशी,सुभाष राठोड , कैलास पाटील माने, बालाजी राठोड ,संतोष पुलेवार ,राम गुंडेकर,शाहीर वानखेडे, सुभाष गुंडेकर, यांच्यासह मान्यवर कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्रिरत्नकुमार भवरे यांनी केले तर आभार लक्ष्मण भवरे यांनी मानले अनेक कलाकारांची उपस्थिती होती.
पालकमंत्र्यांनी निवड समिती गठीत करून कलावंतांच्या प्रस्तांवाना मंजूरी द्यावी- आ.जवळगावकर पोटा येथील लोकपारंपारिक कलावंत,शाहीर मेळावा संपन्न
0
November 12, 2025
Tags
