हिमायतनगर प्रतिनिधी/ जागतिक महिला दिन व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महाराष्ट्र शासन कृषी विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते स्वाती ढगे-बेहेरे यांचा सन्मान करण्यात आला आहे.
जागतिक महिला दिन व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने 2021-22 या आर्थिक वर्षात कृषी विभागामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. जागतिक महिला दिनाची विशेष नोंद घेऊन महिलांचा गौरव करण्यात आला.
तालुका कृषि अधिकारी कार्यालय, हिमायतनगर यांची कृषि विभागातील उत्कृष्ठ कार्याची दखल कृषी सहाय्यक सौ. स्वाती ढगे-बेहेरे यांनी आपल्या क्षेत्रात कृषी विभागाकडून विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राची माहिती देऊन कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांच्या कामाची दखल घेत दि. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कृषी विभाग नांदेड तर्फे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर ,जिल्हाधिकारी विपीन इटनकर ,जिल्हा अधिक्षक कृषी विभाग आर.बी.चलवंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.स्वाती बेहेरे-ढगे यांनी कृषी विभागाचे काम करीत असताना शेतकऱ्यांना शेती निगडित माहिती देऊन उल्लेखनीय काम केले. त्यांचा सन्मानपूर्वक गौरव केल्याबद्दल कृषी अधिकारी, कृषी सहायक यांनी अभिनंदन केले आहे.
