पशुसंवर्धन सहआयुक्तांची ढगे अॅग्रीकॉस,शेती उत्पादक केंद्रास भेट -

हिमायतनगर प्रतिनिधी/ हिमायतनगर येथील ढगे अॅग्रीकॉस शेती उत्पादक केंद्रास प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ चंदेल, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ भुपेंद्र बोधनकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ सखाराम खुणे यांनी शुक्रवारी भेट देऊन सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण सेद्रिय चिकन निर्मीती चे कौतुक करून पुढील कार्यास शभेच्छा दिल्या.हिमायतनगर शहरातील ढगे अॅग्रीकॉस व घारापुर येथील ढगे शेती उत्पादक फॉर्म हाऊस वर भेट देऊन ब्रॉयलर पक्ष्यांबाबत उत्पादन ते विक्री बाबत पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ चंदेल यांनी मार्गदर्शन केले. सर्व तांत्रिक बाबी लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण सेद्रिय चिकन निर्माती चे कौतुक केले.
तसेच पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 हिमायतनगर येथे पशुवैद्यकीय दवाखाना सद्यस्थिती पाहणी करून समाधान वक्त केले.यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ भुपेंद्र बोधनकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ सखाराम खुणे, पशुधन विकास अधिकारी तांत्रिक डॉ अरविंद गायकवाड,वैरण विकास अधिकारी प्रशांत पाटील, डॉ.सोनटक्के व श्याम ढगे, सदानंद ढगे,यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.