हिमायतनगर प्रतिनिधी /महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या शिव भोजनालय थाली सेंटरला तहसीलदार एन.डी.गायकवाड यांनी दुपारी अचानक भेट देऊन उपस्थित नागरिकांना शिवभोजन थाली संदर्भात विचारणा करून येथील सीसीटीव्ही यंत्रणा पाहणी केली आहे.
गेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या शिवभोजन थाळी वाटपात केंद्र चालकांकडून खाेट्या नाेंदी दाखवून लाखो रुपयांची लूट होत असल्याचा आरोप केला होता .या आरोपानंतर राज्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्राच्या संचालकांनी ३१ जानेवारी २०२२ अखेरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश जिल्हा व तालुका स्तरावरील अन्न व नागरीपुरवठा विभागाने काढले होते त्याची अंमबजावणी होत आहे की नाही ह्याची पाहणी करण्यासाठी हिमायतनगर येथील तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार एन.डि.गायकवाड व नायब तहसीलदार राठोड यांनी दि 3 मार्च रोजी श्री परमेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या शिव भोजन केद्रावर जाऊन तेथील सी सी टिव्ही यत्रणा व अन्न पदार्थांचा दर्जा तपासून उपस्थित लाभार्थ्यांना थाली संदर्भात विचार पुस केली आहे
यावेळी उपस्थित तहसिलदार श्री.डी.एन.गायकवाड ,नायब तहसीलदार मा.श्री.व्हि. पी.राठोड,पेशकार पुरवठा विभागाचे .ए.बी.गड्डमवार , शिव भोजनालय केंद्र चालक गजानन रच्चेवार उपस्थित होते
