खासदार हेमंत पाटिल यांच्या प्रयत्नाने हिमायतनगरातील विजपुरवठा सुरळीत

हिमायतनगर प्रतिनिधी/येथिल वार्ड क्र १ मधील विज रोहित्र जळाल्याने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, हि बाब खासदार हेमंत पाटिल यांच्या लक्षात आनुन देताच लगेचच महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून रोहित्र बसवुन विज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने नागरीकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे.

शहरातील वार्ड क्रमांक १ शंकर नगर मधिल विज रोहित्र जळाल्याने एक महिण्या पासुन येथिल रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती, नागरीकांनी हि बाब पत्रकारांच्या निदर्शनास आनुन दिली, तसेच याची माहिती खासदार हेमंत पाटिल यांनाही दिली होती.

रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याचा विषय गंभीर स्वरूपाचा असल्याने लगेचच खासदार हेमंत पाटिल यांनी विज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून विजेचा प्रश्न तात्काळ सोडवण्याच्या लेखी सुचना दि. ३ गुरूवारी केल्या, दि. ४ शुक्रवारी रोहित्र बसवुन विज पुरवठा सुरळीत झाल्याने या भागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.