हिमायतनगर
प्रतिनिधी/ रयतेचे राजे छत्रपती शिवराय व लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचे
वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. 14 जानेवारी रोजी हिमायतनगर
तालुक्यातील पोटा येथे धावती भेट दिली, यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचे
भागवत देवसरकर मित्र मंडळाच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत
करण्यात आले,यावेळी उपस्थितांना शिवप्रेमी बांधवांना मार्गदर्शन करतांना
भागवत देवसरकर माझा सच्चा कार्यकर्ता असून समाजाच्या चळवळीसाठी अतिशय
उत्कृष्टपणे काम करत असून पुढील काळात भागवत देवसरकर यांच्या पाठीशी
खंबीरपणे उभे राहून त्यांना योग्य ती साथ देणार असल्याचे व आगामी जिल्हा
परिषद निवडणुकीत सर्वांनी भागवत देवसरकर यांच्या पाठीशी उभे राहून मदत
करावी असे आवाहन यावेळी बोलताना खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी
आपले मत व्यक्त केले.
यावेळी
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत
देवसरकर,हिमायतनगर तालुकाध्यक्ष पवन सुर्यवंशी,हदगाव तालुकाध्यक्ष अविनाश
कदम,पोटा बु चे सरपंच दत्ता जाधव,सरपंच बाळु पाटील पोटेकर,सुनिल पाटील
देवसरकर,देवानंद पोटेकर,शेख रहीम,नागेश कदम,आकाश दुधडकर,सुदर्शन माने,आकाश
माने,जयवंतराव पाटील,अनिल देवसरकर,आकाश कवडे,संदीप कवडे यांच्यासह भागवत
देवसरकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
