कठोर तपश्चर्या करून गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आनणारे राजा भगीरथ होते ..ह.भ.प.फुटाणकर

कारला येथे राजा भगीरथ जयंती

 


हिमायतनगर प्रतिनिधी/  
हिंदू पुराणातील एक धर्मनिष्ठ व दानशूर राजा, सूर्यवंशातील म्हणजेच इक्ष्वाकुवंशातील या राजाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कठोर तप करुन गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणले आणि साठ हजार पूर्वजांचा उध्दार राजा भगीरथांनी केला असे किर्तन सेवेत ह. भ.प.भिमराव महाराज फुटाणकर यांनी सांगितले. 
     नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर तालुक्यात कारला येथे राजा भगीरथाची मुर्ती असुन समाज बांधवाच्या सहकार्याने मंदिर देखील उभे आहे. येथील बेलदार समाज बांधवाच्या वतीने दरवर्षी राजा भगीरथ जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येते . दि. 14 जानेवारी रोजी जयंती निमित्ताने ह. भ. प. भीमराव महाराज फुटाणकर महाराज यांच्या कीर्तन संपन्न झाले .
या किर्तन सेवेत राजा भगीरथ यांच्या कार्याविषयी सांगताना ह. भ. प. फुटाणकर म्हणाले की राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मांचे पालन केले. त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज गावा गावात मंदिरे उभी आहेत.त्याच प्रमाणे राजा भगीरथ देखील होते. राजा भगीरथ चरीत्रात ,सगर राजे एकत्र ऐऊन सगराने पृथ्वी खोदली म्हणून सागर झाला ,सगराच्या राज्यात जन्माला आले .अंश्वमान हा भाग्यवान होता. माझ्या पुर्वजनाचा उध्दार कशाने होईल तेंव्हा गंगेच्या पर्वतावर योग्य प्राप्त केले. स्वर्गामधील गंगा पृथ्वीवर आण्याकरीता पूर्वजांच्या उध्दार करण्यासाठी गंगा पृथ्वीवर आणली राजा भगीरथाने साधना केली .
स्वर्गामधे राहणारी गंगा मृत्यू लोकांमध्ये यावी लागली भौलेनाथान गंगेच्या रुपाने साध्य केले. राजा भगीरथाने साठ हजार पुर्वजांचा उध्दार भगीरथाने केला. भगीरथ राजाचा वारसा पाहण्यात भगीरथाचे चरित्र होते .म्हणून राजा भगीरथासारखे राजांची जयंती आज होते हि भाग्याची गोष्ट राजा भगीरथ जयंती च्या त्यांच्या विचारांची चालना समाजाने ठेवली पाहिजे असेही किर्तनकार फुटाणकर महाराज यांनी सांगितले. या जयंती सोहळ्याचे आयोजन राजा भगीरथ देवस्थान कमिटी च्या वतीने करण्यात आले होते. या सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.