पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकरी वर्गातून होतेय मागणी
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदतीची मागणी करणार - संजय माने
हिमायतनगर प्रतिनिधी/...
गेल्या
चार दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्माण होऊन सर्वदूर पाऊस झाला
आहे. अजूनही ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या नुकसानीचे पंचनामे करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा
अशी मागणी केली जात आहे.
गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन सर्वदूर पाऊस झाला आहे. अजूनही ढगाळ वातावरण असल्यामुळे गहू हरभरा या रब्बी पिकांसह खरिपातील तुरीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी वर्गातून केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात बुधवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला, आजघडीलाही ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या वातावरणामुळे खरिपातील काढणीला आलेले तुरीचे पीक उध्वस्त झाले असून, वादळी वाऱ्याने गहू, हारभरा जमीनदोस्त झाला आहे. तर सतत पाऊस पडत असल्याने हरभरा हाती येण्यापूर्वीच काळा पडून करपून जात आहे. तसेच गहू पूर्ण आडवा झाला आहे, तुराही चार दिवसापासून भिजून गेल्याने बुरशी धरून पत खराब होत आहे. आता याला बाजारात विकल्यास कमी भाव येऊन आमचे आर्थिक नुकसानच होणार आहे. याचा बरोबर तालुक्यात भाजीपाला, आंबा आणि इतर फळ पिकांच्या बहरावर विपरित परिणाम होणार असल्याचे चित्र सध्याच्या वातावरणावरून दिसते आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदतीची मागणी करणार - संजय माने
गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे तूर, गव्हासह हरभऱ्याचे पीक धोक्यात आले आहे. ज्यांची पिके हाताशी आली त्यांचे पिकावर अळ्यांचा प्रादुभाव वाढला असून, अनेकांच्या पिकांना आलेल्या फुल गळून पडत आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगामही हातातून जातो कि काय अशी भीती वाटते आहे. हि बाब लक्षात घेता शासनाने तातडीने अवकाळी पावसामुळे नुकसानीत आलेल्या रब्बी हंगामातील पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी अशी मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती हिमायतनगर येथील सधन शेतकरी संजय माने यांनी दिली आहे.