जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी हिमायतनगर येथे शांततेत मतदान...माजी आ.जवळगावकरांचे पारडे जड
0
July 27, 2026
हिमायतनगर प्रतिनिधी :/
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथील मतदान केंद्रावर रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती.निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवा सहकारी संस्थांचे २१ तर मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे २ मतदार अशा एकुण २३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याने शंभर टक्के मतदानाची नोंद झाली असुन या निवडणुकीत माजी आ माधवराव पाटील जवळगावकर यांचे पारडे जड असल्याचा विश्वास मतदारांनी व्यक्त केला.
हिमायतनगर गटातून शेतकरी विकास पॅनालचे उमेदवार माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे पहिल्यांदाच सहकार क्षेत्रात उभे राहिले तर जवळगावकरांच्या विरोधात अपक्ष उमेदवार विशाल राठोड हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदान केंद्राबाहेर दोन्ही उमेदवारांचे समर्थक कांग्रेस,भाजपा, शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली. मात्र, संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली.
नांदेड जिल्ह्यातील अनेक गटांमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या असल्या, तरी हिमायतनगर गटात प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क साधून मनधरणी करण्यात येत होती.
माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनीही आपल्या समर्थकांसह मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या निवडणुकीचा निकाल दि. २८ जुलै रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने ते आघाडीवर राहतील, असा विश्वास शेतकरी विकास पॅनालचे मतदान प्रतिनिधी परमेश्वर गोपतवाड , कैलास पाटील माने, संजय पाटील, सचिन राठोड,यांनी व्यक्त केला.मतदान केंद्राबाहेर नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष कांग्रेस,भाजपा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
