कवळे गुरुजींचा ऊस कारखाना हिमायतनगर तालुक्यात उभा करण्याचा निर्णय शेतकरी हिताचा- माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर

हिमायतनगर प्रतिनिधी / या तालुक्यात लवकरच उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या माध्यमातून ऊसाचा कारखाना उभा राहणार असुन या हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असणार आहे यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून बेरोजगारांच्या हाताला काम लागणार आहे पवना गावच्या शेतकऱ्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांना भविष्यात मोठा फायदा होणार असल्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोलताना सांगितले .
  हिमायतनगर तालुक्यातील पवना येथील शेतकऱ्यांनी व्हि .पे.की.उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव पाटील कवळे यांचा ऊस कारखाना उभा करण्यासाठी जागा दिली आहे.त्या शेतकऱ्यांचा सत्कार कवळे गुरुजी व माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.शनिवारी माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी कवळे गुरुजी यांच्या निवासस्थानी वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट देऊन सत्कार केला.
 या सत्कार सोहळ्यात बोलताना माजी आ.जवळगावकर म्हणाले 
कवळे गुरुजी यांनी हिमायतनगर तालुक्यात ऊस कारखाना उभा करण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी हिताचा कौतुकास्पद असुन हा कारखाना उभा करण्यासाठी या भागातील शेतकरी आपल्या सदैव पाठीशी खंबीरपणे असणार आहेत कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही कारखाना जमेल तेवढ्या गतीने काम सुरु करून उभा राहिला पाहिजे ऊस कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची वाढ होणार असुन या भागातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार असुन आपल्या माध्यमातून अनेक दिवसाची मागणी पूर्ण होईल असेही म्हणाले 
    आभार पर बोलताना मारोतराव कवळे गुरुजी म्हणाले कि हिमायतनगर भागातील जमीन सुपिक असून या भागात कारखाना उभा राहिल्यास ऊस उत्पादन वाढणार आहे त्यामुळे शेतकरी प्रगतीकडे वाटचाल करेल मनून विचार झाला पवना गावातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा मदतीने कारखाना उभा करण्याचे स्वप्न असून तुमच्या सर्वांच्या पुढाकाराने पूर्ण होईल अपेक्षा असल्याचे संगितले उपस्थित नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार कवळे गुरुजी यांनी केला या प्रसंगी नगराध्यक्ष शे ख रफीक भाई , तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, संदीप पाटील कवळे, यांच्यासह हदगाव हिमायतनगर उमरी तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.