जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून हिमायतनगर येथे बुधवारी रक्तदान शिबिर

हिमायतनगर प्रतिनिध/- जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रभर दि.7 जानेवारी रोजी जीवनदान महाकुंभ 2026 रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन तालुका सत्संग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
       शहरातील परमेश्वर मंदिर येथे दि.7 जानेवारी रोजी सकाळी 09 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून हे जीवनदान महाकुंभ 2026 सर्व महाराष्ट्रात दरवर्षी प्रमाणे यंदाही पंधरा दिवस चालणाऱ्या या महाकुंभाद्वारे रूग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम संस्थांतर्फे राबविला जात आहे.म्हणून प्रत्येक व्यक्तीने या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन तालुका सांप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.