हिमायतनगर प्रतिनिधी/- नगरपंचायत निवडणुकीत शिंदे शिवसेना गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका प्रभाग क्रमांक 06 मध्ये विजयी झाल्यानंतर त्यांचे नेत्यांकडून कौतुक झाले असुन आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी संधी दिली असल्याने यशस्वी झाले आहे आ.कोहळीकर यांचा सत्कार केला आहे
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत मातब्बर नेत्यांना धक्का बसला आहे परंतु प्रभाग क्रमांक 06 मध्ये मतदारांनी एक ऐतिहासिक विजय मिळवला असुन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.गुरूवारी आ.बाबुराव कदम कोहळीकर यांनी नगरसेवक यांच्या घरी भेट दिली असता आ.कोहळीकर यांचा संतोष मुद्देवाड यांनी भव्य सत्कार केला.या सत्कार प्रसंगी बोलताना कोहळीकर म्हणाले की माझ्या नगरसेवकांच्या पाठिशी कायम असणार असुन प्रभागासह शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्नशील आहे येणाऱ्या काळात या शहरातील विकास कामांना प्राधान्य देऊन विजयी नगरसेवकांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली आहे यावेळी माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर,तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, विजय वळसे पाटील, उपतालुकाप्रमुख राजीव पाटील, शहराध्यक्ष गजानन हारडपकर,संतोष पाटील कदम, साहेबराव चव्हाण, नाथा पाटील,गजानन गोपेवाड,दिलीप ढोणे, भगवान मुद्देवाड, मारोती मिरटकर,रामेश्वर मुद्देवाड,,शिवराम बाभुळकर विठ्ठल कदम शंकर आहेरवाड ,किशोर ढोणे किसन अहिरवाड ,गुरप्पा चव्हाण,लखन गायकवाड दशरथ साळवे,माधव गायकवाड, शिनू गायकवाड, नागेश मिरे,पिराजी बेळे , शंकर गायकवाड,शाम देवकर,मसु गायकवाड यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
