हिमायतनगर शहरातील नगरपंचायत निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले असुन जनतेतून नगराध्यक्ष म्हणून शेख रफिक शेख महेबुब तर आठ नगरसेवक विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष सर्व नगरसेवकांचा पदग्रह सोहळा गुरुवारी दुपारी एक वाजता माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत प्रशासकीय कार्यालयात संपन्न होणार आहे .या पदग्रहण समारंभ सोहळ्यास शहरातील सर्व नागरिक मायबाप जनता सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी केले आहे.
माजी आ. जवळगावकर यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षासह नगरसेवकांचा गुरुवारी पदग्रहण सोहळा - हिमायतनगर शहरातील मायबाप जनतेसह सर्वांनी उपस्थित राहावे नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांचे आवाहन
0
January 07, 2026
हिमायतनगर प्रतिनिधी /- हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी लोकनियुक्त नगराध्यक्षासह नगरसेवकांचा पदग्रह सोहळा होणार असून या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
Tags
