हिमायतनगर प्रतिनिधी/- येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती या निवडणुकीचा निकाल दि.21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला असुन भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक शेख महेबुब यांनी भाजपा उमेदवारांचा पराभुत करून प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले असुन त्यांच्यासह कांग्रेस चे आठ नगरसेवक विजयी झाले तर कोहळीकर यांच्या शिंदे शिवसेना गटाला केवळ दोन जागा मिळाल्या असुन कांग्रेस पक्षाला बहुमत मिळाले आहे.सलग दुसऱ्यांदा नगरपंचायतवर कांग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार असुन या निवडणुकीत माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा करिष्मा पहायला मिळाला असुन भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटाच्या विद्यमान आमदार बाबुराव कदम कोहळीकरांसाठी हा निकाल धक्कादायक लागला आहे.
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ,शिंदे शिवसेना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना उबाठा,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निवडणूक लढविली होती. रविवारी या नगरपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असुन कांग्रेस पक्षाचे थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक शेख महेबुब हे मताधिक्याने विजयी झाले आहेत .
तर कांग्रेस पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आले असुन यामध्ये वार्ड क्रमांक 02 विनोद गुंडेवार, वार्ड क्रमांक 3 अब्दुल कंजुल फिरदौस हक्क, वार्ड क्रमांक 04 सौ.कमल मेंडके, वार्ड क्रमांक 05 हसिना बेगम अब्दुल्ल सलाम, वार्ड क्रमांक 07 सौ.दर्शना पंडीत, वार्ड क्रमांक 14 म.मुजतबा मतीन, वार्ड क्रमांक 15 शेख सलमा बी इलियास, वार्ड क्रमांक 16 सलमा खानम समदखान, ह्या कांग्रेस पक्षाकडून विजयी झाले आहेत.
तर उबाठा शिवसेनेचे नगरसेवक वार्ड क्रमांक 08 मिरझा जिशान बेग मिरझा इसा बेग, वार्ड क्रमांक 09 सौ.सुचीता कुणाल राठोड, वार्ड क्रमांक 12 विठ्ठल भिमराव ठाकरे,
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक वार्ड 01 सौ.दर्शना शरद चायल, वार्ड क्रमांक 10 आशिष सकवान, वार्ड क्रमांक 11 भारत डाके ,
शिंदे शिवसेनेचे वार्ड क्रमांक 17 सुभाष बलपेलवाड , वार्ड क्रमांक 06 सौ.अरूणा भगवान मुद्देवाड,
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वार्ड क्रमांक 13 सरदार खान खलील खान पठाण,हे नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत .
एकुण 17 वार्ड असुन या निवडणुकीत कांग्रेस पक्षाला बहुमत मिळाले आहे कांग्रेस पक्षाचे एकूण 8 नगरसेवक, भाजपाचे 03 , शिंदे शिवसेना 02, शिवसेना उबाठा 03, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 01 जागा मिळाली असुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांचे खातं उघडलं नसल्यामुळे मोठा धक्का बसला आहे.
हिमायतनगर नगरपंचायत चा दर्जा मिळाल्यानंतर प्रथमता कांग्रेस पक्षाचा झेंडा फडकला होता त्यानंतर पुन्हा माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा करिष्मा पहायला मिळाला असुन मताधिक्याने कांग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपासाठी सभा आयोजित करून ताकद लावली होती तर शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार बाबुराव कदम कोहळीकर, यांनी देखील दोन मंत्र्यांच्या सभा आयोजित केल्या होत्या परंतु मतदारांनी कांग्रेस पक्षाला कौल दिला आहे.
