हिमायतनगर शहरातील जनतेनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - जवळगावकर नवनिर्वाचित नगराध्यक्षासह नगरसेवकांचा सत्कार

हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील मतदारांनी कांग्रेस पक्षावर सलग दुसऱ्यांदा दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही येणाऱ्या काळात नगरपंचायत च्या माध्यमातून शहरातील विकास कामे पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असुन विजयी उमेदवारानी पुन्हा जोमाने कामाला लागावे असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे.
      हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाकडून माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षासह 17 जागेवर उमेदवार उभे केले होते.भाजपा , शिवसेना शिंदे, शिवसेना उबाठा गटाला धक्का देत मतदारांनी विकासाला महत्त्व देऊन कांग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षांसह आठ नगरसेवकांना‌ मताधिक्याने विजयी केले मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा ठाम विश्वास जवळगावकरांनी व्यक्त केला हिमायतनगर येथील सर्व विजयी उमेदवारांनी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची सोमवारी हदगाव येथे भेट घेऊन प्रथमता जवळगावकरांचा सत्कार केला आहे.या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबुब,माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, समद खान,सभापती जनार्दन ताडेवाड, नगरसेवक विनोद गुंडेवार,अ.कलीम,सौ.दर्शना‌ रमेश पंडित, संभाजी मेंडके,इलियास भाई माजी नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमिद‌,आमित आडसुळ,खरेदी विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड ,संचालक गणेश शिंदे, शेख रहिम भाई, संजय माने,फेरोज खान,राजीव जैस्वाल,पवन बंडेवार,खालीद मतीन,हनिफ भाई,योगेश चिलकावार,दिपक कात्रे,सुमित कांगणे, संतोष जिचकर,किसन नरवाडे, संतोष वानखेडे,नाचारे,गणेश रच्चेवार,मिर्झा जाहीरबेग,तबरेज भाई, सचिन माने,जावेद खतीब, यांच्यासह नगरसेवक कांग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.