शिंदे शिवसेना गटाच्या अरूणा मुद्देवाड यांचा मताधिक्याने विजयी हिमायतनगर शहरातील प्रभाग सहा मधील मतदारांचे मानले आभार

हिमायतनगर प्रतिनिधी/- नगरपंचायत निवडणुकीत शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिंदे शिवसेना गटाची उमेदवारी सौ.अरूणा मुद्देवाड यांना दिली होती. 21 डिसेंबर रोजी लागलेल्या निकालामध्ये कांग्रेस, भाजपाच्या उमेदवारांना धक्का देत शिंदे गटाने या प्रभागात बाजी आरली असुन मतदारांनी शिवसेना उमेदवाराला पसंती देत मुद्देवाड यांचा दणदणीत विजय झाला आहे हा विजय माझा नसुन प्रभागातील मतदारा बांधवांचा असल्याची भावना व्यक्त केली आहे.

         हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक 06 मधून शिंदे शिवसेना गटाच्या उमेदवार सौ .अरुणा मुद्देवाड यांना आ.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढविली आहे.या प्रभागांमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेविका यांना मतदारांनी मताधिक्य दिले.नगरसेविका अरुणा मुद्देवाड यांचा दणदणीत विजयी झाल्या आहेत.निवडुन आल्यानंतर बोलताना म्हणाले की आ.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नेतृत्वाखाली या वार्डातील अपुरे विकास कामे पूर्ण करून मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करून दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे सांगितले आहे.यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका करुणा मुद्देवाड यांचा जल्लोषात सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या विजया बद्दल आ.बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाध्यक्ष विवेक देशमुख, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, विजय वळसे पाटील, विकास पाटील देवसरकर, गजानन हरडपकर,संतोष कदम , यांनी अभिनंदन केले यावेळी भगवान मुद्देवाड,संतोष मुद्देवाड,मारोती मिरटकर, रामेश्वर मुद्देवाड,साहेबराव चव्हाण,शिवराम बाभुळकर विठ्ठल कदम शंकर आहेरवाड 
किशोर ढोणे किसन अहिरवाड ,गुरप्पा चव्हाण,लखन गायकवाड दशरथ साळवे,माधव गायकवाड, शिनू गायकवाड, नागेश मिरे,पिराजी बेळे , शंकर गायकवाड,शाम देवकर,मसु गायकवाड, व्यंकटी गायकवाड, गणेश गायकवाड, संजय बाभुळकर,राजू गायकवाड,बालाजी कदम, किशोर जिल्हावार, मारोती गिरी, मारोती चिंचलवाड,साई तुंबलवाड, संजय मुत्तलवाड, शंकर कदम, अंकुश बेळे, शंकर गायकवाड यांच्यासह मतदार बांधव शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.