कारला येथील श्री कृष्ण मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा - भक्तीमय कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा ग्रामस्थांचे आवाहन

 हिमायतनगर प्रतिनिधी / तालुक्यातील कारला येतील श्री कृष्णा मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजित केले असून २१ डिसेंबर ते २८ डिसेंबर पर्यंत सप्ताह चालणार आहे हरिकीर्तन ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा लाभ भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कारला ग्रामस्थांनी केले आहे .
                    कारला गावातील श्री कृष्ण मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला असून या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी काकडा ,ज्ञानेश्वरी पारायण ,सायंकाळी हरिपाठ ,रात्री हरिकीर्तन हे असणार आहेत .या सप्ताहातील कीर्तनकार ह भ प सुधाकर महाराज खैरगावकर , ह भ प.प्रतीक्षा महाराज अनगुलवार सवनेकर , ह भ प अंजलीताई डांगे हिमायतनगर , गजानन महाराज मरळकर,गुरूवर्य महारुद्र स्वामी महाराज दैठणेकर , बालयोगी श्यामसुंदर महाराज बेंद्रीकर ,ह .भ.प.ऋषिकेश महाराज पिपरीकर , व काल्याचे कीर्तन ऋषिकेश महाराज पिपरीकर यांचे होणार आहे कीर्तनकारांना संगीताची साथ गायनाचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज,ह.भ.प. मारोती महाराज राहुलवाड ,ह.भ.प.आनंद महाराज घोसलवाड ,ह.भ.प.भगवान महाराज गुंफलवाड ,मृदंगाचार्य ह.भ.प.प्रथमेश यटलेवाड ,तबलावादक अशोक महाराज बोम्पीलवार ,हार्मोनियम रामदास बोम्पीलवार महाराज ,माधव गारसेटवाड ,विणेकरी अशोक महाराज ,हे सर्व महाराजांच्या उपस्थित अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे सप्ताह समारोप काल्याच्या किर्तनाने होणार आहे या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशे आव्हानं श्री कृष्ण कमिटी गोपाळ मंडळी व कारला ग्रामस्थानी केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.