हिमायतनगर प्रतिनिधी / (सोपान बोंपीलवार) हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून देखील अवस्था जैसे थे असून अपुरा स्टॉफ अनेक मशीनरी उपलब्ध असुन धूळखात पडून आहेत एव्हडेच नाही तर दोन वर्षांपासून कोट्यवधीची इमारत काम पूर्ण होऊन देखील रूग्णालयाच्या ताब्यात का दिली नाही नव्या इमारतीचे बेहाल झाले आहे.एकीकडे रुग्णांसाठी जागा अपुरी असतांना ईमारत धूळखात का ठेवली असा प्रसन्न उपस्थित होतो आहे गुतेदारानी कामही बोगस केल्याचा आरोप असुन याकडे जिल्हा आरोग्य यंत्रणेसह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले असल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत असुन याकडे जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या वरिष्ठांसह लोकप्रतिनिधीनी लक्ष देऊन रूग्णांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे.
हिमायतनगर शहरात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून अनेक सोई सुविधा दिल्या असल्या तरी जिल्हा चिकित्सक तशेच स्थानिक चे जबाबदार अधिकारी यांच्या अकर्तव्येनिष्ठ कारभारामुळे या रुग्णालयाची मोठी अवस्था पहायला मिळत आहे .
विशेष म्हणजे शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण या ठिकाणी उपचार मिळावेत या उद्देश्याने येत असतात परंतु या रुग्णालयात असलेला अपुरा स्टाफ वॆद्यकीय अधिकारी परमनंट नाही त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत तसेच या रुग्णालयात आलेय रुग्णांना एक्सरे , ईसीजी ,सोनोग्राफी करावयाची असल्यास उपलब्द नाही असे सांगून रुग्णांना परत पाठवले जात असल्याचा प्रकार सुरू आहे.
विशेष म्हणजे या रुग्णालयात रुग्णांचे डिजीटल एक्सरे , सोनोग्राफी, इसिजी यासाठी लागणाऱ्या जवळपास लाखो रुपयांच्या मशीनरी यंत्र उपलब्ध असून देखील बंद अवस्थेत धुळखात पडून आहेत.डिजिटल एकसरे मशीनरी अद्यापही उघडली नाही आली तसिच पडून आहे तर इसीजी मशीनरी काम पहाणारे अधीकारी वेळेत उपलब्ध राहत नसल्या कारणाने ती मशीन देखील पडून आहे . या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असून देखील केवळ अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा वारिस्टांचे दुर्लक्ष यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे बेहाल झाल्याचे चित्र आहे .
यांच जुन्या इमारतीवर एक नवी इमारतीचे बांधकाम जवळपास दोन कोटीच्या निधीतून उभारण्यात आली असुन इमारतीचे बांधण्यात नांदेड व हिमायतनगर येतील गुतेदारानी केले तेही काम अर्धवट अवस्थेत आहे.लिफ्ट असून देखील बसवली नाही पावसाळ्यात इमारत संपूर्ण गळू लागली अशी माहिती मिळाली आहे हि भव्य इमारत पूर्ण होऊन देखील अद्यापही रुग्णालयाच्या ताब्यात का दिली गेली नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे .
सकाळी ओपीडी पासून ते सायंकाळ पर्यंत रुग्णालयात १२ सिस्टर चा स्टाफ असताना देखील केवळ ४ सिस्टरना संपूर्ण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत.
ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय स्टाफ वाढवण्यात आला नाही रुग्णांची बेहाल अवस्था होत आहे कोणत्याही तपासणी मशीन सुरु नाहीत यामुळे रुग्णांना केवळ फक्त मेडिसिन वर आरोग्य तपासणी होते बाकी मात्र काहींनी उपलब्द नसल्याने शरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णाकडून या ग्रामीण रुग्णालयाचा कारभारावर संताप व्यक्त होत आहे .जिल्हाचित्सक यांनी भेट दिली असली तरी आरोग्य यंत्रणे बाबतीत काहीही उपाययोजना झाल्या नाहीत अशी माहिती दिली आहे.लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ग्रामीण रुग्णालयाचा कारभार सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.
