हिमायतनगर प्रतिनिधी/- हिमायतनगर विकासापासून वंचित राहिले असुन गेल्या अनेक वर्षापासून शहरातील जनतेचा केवळ मता पुरता वापर केला गेला असुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या शहराचा विकास कामे करून देण्यात हमी देतो या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रचार सभेत बोलताना सांगितले आहे.
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवत असुन या उमेदवारांच्या प्रचारार्थ आ.प्रताप पाटील चिखलीकर यांची भव्य सभा शहरात आयोजित करण्यात आली होती.नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म जावेद अ गणी यांनी या व्यासपीठावरून बोलताना म्हणाले की शहरात कांग्रेस च्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला इदगाह सह अनेक ठिकाणी कामे न करताच निधी लाटला असल्याचा आरोप केला त्यांना धडा शिकविण्यासाठी माझ्यासह सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले
तर आ.प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हि नगरपंचायत निवडणुक लढवत आहोत नांदेड च्या माजी मुख्यमत्र्यांनी चाळीस वर्षे कांग्रेस पक्षात राहून मोठ मोठ्या पदावर बसले होते हिमायतनगर सह नांदेड जिल्ह्यातील मुस्लिम,दलीत बांधवाचा मतदानापुरता वापर केला विकासाच्या नावाखाली शहराची दुरावस्था केली या ठिकाणच्या कांग्रेस नेत्यांनी देखील कामे पूर्ण केली नाही त्यामुळे त्यांना या निवडणुकीत मतदार बांधवांनी धडा शिकवला पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून द्या येणाऱ्या काळात शहराचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी माझी असेल असे आवाहन चिखलीकर यांनी केले आहे.अभिषेक लूटे,तालुकाध्यक्ष वामन मिराशे, शहराध्यक्ष अमोल धुमाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
