हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिवसेना उमेदवार राम ठाकरे हे नगराध्यक्ष पदासाठी असून शिवसेनेकडून गेल्या 30 वर्षापासून एकनिष्ठ असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली असून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देऊन शिवसेना भाजपा बि-टीमला त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांनी प्रचार सभेत केले आहे.
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ परमेश्वर मंदिर प्रांगणामध्ये सामाजिक न्याय मंत्री शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांची जाहीर सभा झाली या सभेत आमदार हेमंत पाटील आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेमध्ये आमदार कोहळीकर यांच्या हस्ते संजय शिरसाठ यांचा सत्कार करण्यात आला तसेच या व्यासपीठावरून बोलताना मंत्री संजय शिरसाठ म्हणाली की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नगरपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे केले असुन शिवसेनेनी शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणीची साथ आजपर्यंत दिली गेल्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणच्या मतदारांनी शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम निवडुन दिलें त्याच पद्धतीने या नगरपंचायत निवडणुकीत आपले उमेदवार स्वबळावर उभे केले आहेत .
आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी एका सच्चा कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आहे आणि तीस वर्षापासून सामाजिक धार्मिक कार्यात सहभागी राहून गोर गरिबांच्या न्यायासाठी झगडणारा राम ठाकरे हा उमेदवार आपल्या शहरांच्या विकासासाठी झटणारा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे या निवडणुकीत त्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे.शिवसेनेची सत्ता असुन आमदार देखील आहे त्यामुळे या ठिकाणी नगराध्यक्ष नगरसेवक निवडून द्या आणि शहराचा कायापालट आम्ही येणाऱ्या काळात करून दाखवणार आहोत म्हणून सर्व मतदार बांधवांनी शिवसेनेचे उमेदवार राम ठाकरे यांच्यासह नगरसेवकांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाठ यांनी सभेत बोलताना केले आहे.या सभेसाठी आ.बाबुराव कदम कोहळीकर, माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, जिल्हाध्यक्ष विवेक देशमुख, युवा जिल्हाध्यक्ष संदेश पाटील,संभाजी लांडगे,विकास पाटील देवसरकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे, विजय वळसे पाटील, विकास पाटील देवसरकर,शहराध्यक्ष गजानन हारडपकर, कैलास राठोड,राजीव जाधव, अन्वरखान पठाण, सदाशिव सातव, सुनील चव्हाण, संतोष कदम,शाम पाटील, ज्ञानेश्वर पुठेवाड, यांच्यासह शिवसैनिक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
