हिमायतनगर प्रतिनिधी / (श्रीनिवास बोंपीलवार)
कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे भाविकांनी दर्सनासाठी रांगा लावल्या होत्या गेल्या वीस वर्षांपासून विठ्ठल रुकीमीच्या दर्शनासाठी वारी करीत असलेल्या हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु गावाचे अल्पभूधारक शेतकरी भक्त सुशिलाबाई रामराव वालेगावकर याना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शासकीय पूजेचा मान मिळाला आहे.हिमायतनगर तालुक्यात आजपर्यंत च्या वारकरी संप्रदायामध्ये प्रथमच शासकीय पूजेचा बहूमान या दांपत्याला मिळाला असुन अनेक दिवसाच्या पंढरपूर वारीचे फलित विठ्ठलाने दिले असल्याची प्रतिक्रिया या कुटुंबीयाने व्यक्त केली आहे .
हिमायतनगर तालुक्यात अनेक हजारो भक्त दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असतात यामध्ये महिनाभराची आषाढी पायी वारी तसेच कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्त गण मोठ्या संख्येने पंढरपूर कडे रवाना होतात .
कार्तिकी एकादशी निमित्त देखील हिमायतनगर तालुक्यातून अनेक वारकरी पंढरपूर येथे गेले होते. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्री पासून रांगा लावल्या होत्या . कार्तिक एकादशी निमित्त रविवारी सकाळी शासकीय पुजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक झाली दरम्यान दर्शनासाठी रांगेत उभे असलेले हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु .गावाचे रहिवासी सुशिलाबाई रामराव वलेगावकर यांना माळकरी मानाचा वारकरी म्हणून उपमुख्यमंत्री यांच्या सोबत पुजेचा मान मिळाला आहे.
पोटा बु .गावाचे रहिवासी अल्पभूधारक शेतकरी सुशिलाबाई रामराव वलेगावकर हे गेल्या विस वर्षांपासून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी पायी वारीसह,एकादशी ला देखील जात असतात आज कार्तिकी एकादशी ला आमच भाग्य उजळले असुन विठ्ठलाच्या मनाचा वारकरी म्हणून शासकीय पुजेचा मान मिळाला सपत्नीक पूजेचा मान उपमुख्यमंत्री यांच्या समवेत मिळाला आज विस वर्षांपासूनची वारी फळाला आली असुन विठ्ठलाच्या कृपेने हा मान मिळाला असल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे. हिमायतनगर तालुक्यात पहिल्यांदाच या वारकरी दाम्पत्याला विठ्ठलाच्या शासकीय पुजेचा मानाचा वारकरी म्हणून पुजेचा मान मिळाला ते दोघेही भाग्यवान आहेत .ते एक शेतकरी कुटुंबीय असुन त्यांना मिळालेल्या मानाचा वारकरी म्हणून मान हा मोठ्या भाग्याने त्यांच्या वाट्याला आला त्याबद्दल त्यांचे कौतुक अशी प्रतिक्रिया ह.भ.प.माधव महाराज बोरगडीकर यांनी व्यक्त केली व हिमायतनगर तालुक्यातील वारकरी संप्रादायाच्या वतीने अभिनंदन कौतुक केले आहे.
