हिमायतनगर प्रतिनिधी/-तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत सर्व जागेवर पुन्हा एकदा कांग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तनमनाने कामाला लागावे दोन्ही जिल्हा परिषद गट आणि चार गणातील मतदारांच्या विश्र्वासातील व संपर्कात असणारा उमेदवार जनतेच्या मनातून निवडला जाणार आणि त्यांना पक्षाची संधी मिळणार असुन प्रत्येक कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागावे असे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आढावा बैठकीत केले आहे.
जवळगाव येथे मंगळवारी कांग्रेस पक्षाची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात इच्छुकांच्या आढावा बैठकीचे आयोजन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.या बैठकीत सरसम, कामारी पोटा बु गण गटातील कांग्रेस पक्षाच्या इच्छुकांनी हजेरी लावली होती.या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार जवळगावकर म्हणाले की हिमायतनगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती गणातील मतदारांच्या मनातील उमेदवारांना संधी मिळेल त्याकरीता प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेच्या सुखदुःखात कामी गेले पाहिजे/
प्रत्येक नागरिकांच्या कामाला धावून जाणारा व्यक्ती या निवडणुकीत उमेदवार असेल त्यामुळे जनतेची सेवा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे यावेळी सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत सर्व जागेवर गेल्या निवडणुकीत कांग्रेस पक्षाचा झेंडा फडकला होता त्याच जिद्दीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि पुन्हा या तालुक्यातील दोन जिल्हा परिषद चार पंचायत समिती गण कांग्रेस पक्षाच्या ताब्यात घेण्याचे आवाहन माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले आहे या बैठकीत सरसम, कामारी पोटा बु, जिल्हा परिषद गट गणातील इच्छुक, कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते
