हिमायतनगर प्रतिनिधी /- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त सर्वांगीण संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा समारोप गुरुवारी हिमायतनगर शहरातून भव्य दिंडी नामजप करीत करण्यात आला आहे.
हिमायतनगर गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने गेल्या सात वर्षापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त सर्वांगीण सुसंस्कार शिबिर सप्ताहाचे आयोजन करण्यात येते यावर्षी देखील या शिबिराचे आयोजन 24 ऑक्टोंबर पासून करण्यात आले होते 30 ऑक्टोबर रोजी या शिबिराचा समारोप राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक सामुदायिक प्रार्थना मंदिर करण्यात आला .या सुसंस्कार शिबिरामध्ये हिमायतनगर तालुक्यातील वीस गावच्या मुला मुलींनी सहभाग घेतला होता या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या संस्कार या विषयासह अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.यामध्ये ग्रामगीता काळाची गरज, प्लास्टिक मुक्ती, विविध खेळ ,कबड्डी खो-खो ,हॉलीबॉल किरकेट, सामुदायिक प्रार्थना कृषी विषयक उद्योग, गोपालन पर्यावरण वृक्षारोपण , व्यसनमुक्ती आर्मी भरती यासह तरुणांना राष्ट्रीय धार्मिक सामाजिक प्रश्नावर चर्चासत्र ठेवण्यात आले होते.
या शिबिरासाठी श्रीराम वाळके कार्यक्रमाचे मार्गदर्शक वैराग्यमूर्ती चैतन्य महाराज ह भ प ग्रामगीताचार्य वेदांत महाराज ह भ प गोपाळ महाराज मुळझरेकर मुलींना मार्गदर्शन शुभांगी ताई दाभोले भाऊसाहेब बराटे यांची उपस्थिती होती. या शिबिरासाठी गोविंद पाटील , विठ्ठल देशमवाड,,परमेश्वर इंगळे यासह अनेकांनी परिश्रम घेतले व या सुसंस्कार शिबिर कार्यक्रमाचा समारोप गुरुवारी शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक सामुदायिक प्रार्थना मंदिर हिमायतनगर येथे करण्यात आले यावेळी अनेक मुला मुलीसह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवा मंडळाचे भक्तगण उपस्थित होते.
