हिमायतनगर प्रतिनिधी/- पोटा गावापासून शिवसेना पक्षाची पताका घेऊन संतोष पुलेवार यांनी गेल्या विस वर्षांपासून निष्ठेने पक्षाचं काम केले या माध्यमातून या भागातील वाडी , तांडे डोगंर दऱ्यात वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या कामांना प्राधान्य देऊन समाज कार्य सक्रिय सुरू ठेवले खा.नागेश पाटील आष्टीकर यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असुन त्यांनी पोटा बु पंचायत गणाचे आरक्षण ओबिसी करीता आरक्षीत झाला असुन या गणातून संतोष पुलेवार यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी या गणातील मतदारातुन होत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील पोटा गावचे माजी सरपंच ,युवासेना तालुका समन्वयक संतोष पुलेवार यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या भागातील अपंगांना सायकल भेट , शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप,ग्राम भुषण पुरस्कार कार्यक्रम यासह विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन केले होते.दरवर्षी शिवसेनेचा युवा तालुका समन्वयक म्हणून पक्षांसाठी पक्ष वाढीसाठी सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे.
पोटा गाव तालुक्यापासून विस कि.मी.अंतरावर आहे.या भागातील नागरिकांना आपल्या कामासाठी तहसील पंचायत समिती कार्यालयात खेटे घालावे लागतात रोज मजुरी करणाऱ्या दररोज काम करण्यासाठी यावं लागतं परंतु शिवसेनेचे संतोष पुलेवार हे या नागरीकांची कामे स्वत पुढाकार घेऊन करतांत हे विशेष आहे.
संतोष पुलेवार यांनी गेल्या काही वर्षांपासून शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठ राहिले खा.नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली काम केले.लोकसभा,विधानसभा निवडणुकीत जबाबदारी घेऊन आपल्या भागातून शिवसेना पक्षाला ताकद देण्याचं काम त्यांनी केले आहे त्यांची कामारी पोटा बु जिल्हा परिषद गटांतील प्रत्येक कार्यकर्त्यां पर्यंत त्यांनी आपली ओळख निर्माण केली तालुक्यातही त्यांची निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ख्याती आहे.पक्षाला दिलेला शब्द पाळून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यात ते नेहमी कार्यशिल असतात संतोष पुलेवार यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा पाहता त्यांना पोटा बु.पंचायत समिती गणातून शिवसेनेची उमेदवारी द्यावी अशी मागणी या भागातील मतदार नागरिकांतून होते आहे.पोटा बु .पंचायत समिती गणातील मतदारांच्या ओळखीचा चेहरा संतोष पुलेवार आहेत त्यांना या गणातून उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
