महाराष्ट्र कामगार मंडळाकडून उत्कृष्ट तबला वादक उदय जाधव यांचा सन्मान

हिमायतनगर प्रतिनिधी/-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय नांदेड विभाग आयोजित पुरुष भजन स्पर्धेत... उत्कृष्ट तबला वादक म्हणुन श्री उदय लक्ष्मण जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला त्याबद्दल कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला परीक्षक म्हणुन सौ.आनंदी विकास , श्री सुधीर पळशीकर,श्री किरण सावंत यांनी उत्कृष्ठ परीक्षण केले .आणि उदय जाधव यांनी नादब्रह्म संगीत विद्यालयात गुरूवर्य सचिन बोंपिलवार यांच्याकडे तबला शिक्षण घेऊन अखिल भारतीय गांधर्व मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात येणार्‍या विशारद पूर्ण तबला परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे... त्याबद्दल प्रा.शिवदास शिंदे  यशवंत महाविद्यालय,प्रा.संगीता चाटी , श्री व्यंकट कोत्तापल्ले  व नादब्रह्म संगीत विद्यालयाचे संचालक  बोंपिलवार यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.