हिमायतनगर अज्ञात चोरट्याने मेडिकल शॉप फोडून शुक्रवारी मध्यरात्री केली चोरी


हिमायतनगर प्रतिनिधी /शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मामिडवार कॉम्प्लेक्समधील सुनील मेडिकल या दुकानाचे कुलूप अज्ञात चोरट्याने लोखंडी रॉडच्या साहाय्याने तोडत आत प्रवेश केला.आणि गल्ल्यातील अंदाजे १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली.


त्या वेळी शहरात दुर्गा मूर्ती विसर्जनाची मिरवणूक सुरू असल्याने परिसरात गडबड होती. याचा फायदा घेत चोरट्याने ही घटना घडवली असावी. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी मेडिकल चालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चोराकडून सोडलेला लोखंडी रॉड आणि तुटलेले कुलूप ताब्यात घेतले आहे. शेजारच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली चोरीची मालिका पुन्हा सुरू झाल्याने दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी 
चोरीच्या घटनेनंतर स्थानिकांची पोलिस प्रशासनाकडे मागणी केली व सणोत्सव काळात गस्त वाढवावी चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन मुसक्या आवळाव्यात आणि सुरक्षा द्यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.