हिमायतनगरात नवरात्र विसर्जनावेळी गोंधळ दुर्गंधीयुक्त विहिरीवरून भाविकांचा संताप... आमदारांच्या हस्तक्षेपानंतर समाधान

 

हिमायतनगर प्रतिनिधी /शहरात घटस्थापनेपासून नवरात्र उत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. महिला व मुलींनी देवीची उपासना करत विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून भक्तिभावाने आराधना केली. शुक्रवारी उशिरा मातेची विसर्जन मिरवणूक निघाली. मिरवणूक शांततेत पार पडली, मात्र विसर्जन स्थळी नगरपंचायतीने तयार केलेल्या दुर्गंधीयुक्त विहिरीत मूर्ती विसर्जन करण्यास भाविकांनी ठाम विरोध दर्शवला.

गेल्या अनेक वर्षांपासून विहिरीतील गाळ काढला नसल्याने विहिरीत कुजलेल्या पाण्यामुळे सुगंधी सुटल्याने भाविकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाचा संताप व्यक्त केला. परिणामी विसर्जन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आणि महिला-पुरुष भक्तांना रात्रभर जागून बसण्याची वेळ आली. दरम्यान हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मच्छीमार पथक व क्रेनची व्यवस्था करून भाविकांची समजूत काढली. प्रशासनाच्या माध्यमातून शनिवारी सकाळी ६ वाजता कनकेश्वर तलावात विसर्जनाला सुरुवात करण्यात आली, त्यानंतर शांततेत विसर्जन सुरू झाले 

शहरातील शनिवारी सकाळी सुमारे ७ ते ८ मूर्तींच्या मिरवणुका मार्गावर होत्या. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत शांततेत विसर्जन पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मुख्याधिकारी पल्लवी टेमकर यांनी विसर्जन नियोजनात कसूर करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने काही प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले. तरीही नगरपंचायत प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराबाबत भाविकांनी तीव्र नाराजी दर्शवली. "आगामी काळात अशा अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच तयारी करावी, हा आमचा ठाम आग्रह! आहे असा स्पष्ट संदेश भाविकांनी दिला.
          
        शनिवारी सकाळी हिमायतनगर शहरातील काही राहिले होते ते व ग्रामीण भागातील दुर्गा विसर्जन करण्यात आले प्रत्येक दुर्गा मंडळाने आनंदौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला दांडिया गरबा खेळत महिला भक्तांनी दुर्गा मातेला निरोप दिला.तालुक्यात शांततेच्या वातावरणात विसर्जन करण्यात आले.
    

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.