हिमायतनगर| शारदीय नवरात्र उत्सव सर्वत्र आनंदात सुरू आहे. मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे उत्सवावर देखील याचा परिणाम झाला आहे. दरवर्षी उत्सवाच्या काळात अष्टमीला हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर वाढोण्याचे कुलस्वामिनी माता कालिंका देवी मंदिरात उपस्थित होऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतात.
यंदाही त्यांनी बुधवारी एका कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर माता कालिका मंदिरात उपस्थित होऊन महिषासुर मर्दिनीच्या अवतार शेकडो वर्षापासून उभी असलेल्या नवसाला पावणाऱ्या माता कालिंका देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी माझ्या शेतकरी बळीराजाला या मोठ्या संकटातून बाहेर निघण्याची शक्ती दे.. आणि मतदार संघातील सर्वसामान्यांना सुख समृद्धी दे... अशी मनोमन कामांना देखील त्यांनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन केली आहे.
यावेळी कालिका मंदिरातच्या वतीने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला तसेच कालिंका देवीची प्रतिमाही भेट देण्यात आली. याप्रसंगी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मातेचे भक्त, शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
