हिमायतनगर येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपन्न
हिमायतनगर प्रतिनिधी/- घरातील महिला सशक्त आरोग्यदायी असेल तर त्या घरातील परिवार कुटुंब कायम सुखी असु शकते म्हणून प्रत्येक माता भगिनींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कुठल्याही प्रकारचा आजार अंगावर घेऊ नका कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अनेक महिला भयंकर आजाराने त्रस्त असुन माता भगिनींनी जागृत होऊन काहीही आजार जानवत असल्यास वेळेत उपचार घेणे गरजेचे आहे तेव्हाच सशक्त नारीचा संकल्प पूर्ण होईल असे खा.नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले आहे.
हिमायतनगर शहरातील उपजिल्हा रुग्णालयामध्ये बुधवारी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे आयोजन बुधवारी आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. नागेश पाटील आष्टीकर तर उद्घाटक म्हणून आ.बाबुराव कदम कोहळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानामध्ये ग्रामीण भागासह शहरातील महिलांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना खासदार नागेश पाटील म्हणाले की आजच्या घडीला घरातील महिला ही सशक्त व आरोग्यदायी असायला पाहिजे परिवार सुखी व्हायचा असेल तर माता भगिनींच्या आरोग्याची काळजी प्रथमता घेतली पाहिजे घरातील माता भगिनींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व होणाऱ्या आजारावर वेळेत उपचार करून घ्यावेत अंगावर दुखणं घेऊन असे आवाहन खा .आष्टीकर यांनी व्यक्त केले.
तर याच कार्यक्रमात आमदार बाबुराव कदम होळीकर बोलताना म्हणाले की महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे व जे काही आजार असेल ते डॉक्टरांकडे दाखवून वेळेवर उपचार करून घेतले पाहिजे तेव्हाच कुठेतरी आजाराला आळा बसू शकते म्हणून प्रत्येक माता-भगिनींनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे कोहळीकर यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख ,शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, संजय काईतवाड, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विकास जाधव , वैद्यकीय अधिकारी विकास वानखेडे, वैद्यकीय अधिकारी रवि वाळके,श्रेयश देशमुख, संदीप वागतकर, अभिजित भुतकर, सदावर्ते,मुनेश्वर, धांडे पाटील, आरोग्य सेविका मेश्राम, संदीप नारखेडे,यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी अधिकारी महिला आरोग्य सेविका पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
