हिमायतनगर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर — नगरपंचायत वर महिला राज.

 


हिमायतनगर, दि. ७ ऑक्टोबर २०२५ — हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण "सर्वसाधारण (ओपन)" वर्गासाठी जाहीर झाले असून, या घोषणेनंतर नगरपंचायतीच्या राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे. आरक्षण जाहीर होताच शहरातील भावी नगराध्यक्ष पदाचे सुमारे १७ संभाव्य उमेदवार आपापल्या गोटात सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.17 पैकी 9 जागेवर महिलांसाठी वार्ड राखीव असल्याने पुरुषांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न भंगले असले तरी महिला राज येणार असल्याने नवचैतन्य निर्माण झाले आहे 

 आरक्षण सोडतेचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी तहसीलदार पल्लवी टेमकर वं नगरपंचायत चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आगामी दिवाळीच्या नंतर निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, नगरपंचायतीच्या १७ वार्डांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे —

🏙️ हिमायतनगर नगरपंचायत वार्डनिहाय आरक्षण

1️⃣ वार्ड क्र. 01 — खुला महिला (Open – महिला)
2️⃣ वार्ड क्र. 02 — खुला (Open)
3️⃣ वार्ड क्र. 03 — ओबीसी महिला (OBC – महिला)
4️⃣ वार्ड क्र. 04 — एसटी महिला (ST – महिला)
5️⃣ वार्ड क्र. 05 — खुला महिला (Open – महिला)
6️⃣ वार्ड क्र. 06 — ओबीसी महिला (OBC – महिला)
7️⃣ वार्ड क्र. 07 — एससी महिला (SC – महिला)
8️⃣ वार्ड क्र. 08 — खुला (Open)
9️⃣ वार्ड क्र. 09 — ओबीसी महिला (OBC – महिला)
🔟 वार्ड क्र. 10 — खुला (Open)
1️⃣1️⃣ वार्ड क्र. 11 — ओबीसी (OBC)
1️⃣2️⃣ वार्ड क्र. 12 — खुला (Open)
1️⃣3️⃣ वार्ड क्र. 13 — खुला (Open)
1️⃣4️⃣ वार्ड क्र. 14 — ओबीसी (OBC)
1️⃣5️⃣ वार्ड क्र. 15 — खुला महिला (Open – महिला)
1️⃣6️⃣ वार्ड क्र. 16 — खुला महिला (Open – महिला)
1️⃣7️⃣ वार्ड क्र. 17 — खुला (Open)



या आरक्षणात महिला उमेदवारांसाठी सर्वाधिक जागा आरक्षित झाल्याने यंदाच्या निवडणुकीत "हिमायतनगर नगरपंचायतीवर महिला राज येणार" अशी चर्चा शहरभर रंगू लागली आहे. इच्छुकांनी आपापल्या परीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापासूनच भावी नगरसेवक म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे.

नगराध्यक्षपद खुले वर्गासाठी जाहीर झाल्यामुळे अनेक अनुभवी तसेच नवोदित नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा पुन्हा जाग्या झाल्या असून, निवडणुकीचा रंग अधिक गडद होत चालला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.