हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ब.स.पा. स्वबळावर लढविणार - गणेश राऊत

हिमायतनगर प्रतिनिधी/-नगरपंचायत सह जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होत असुन या सर्व निवडणुका बसपा स्वबळावर लढणार असुन सर्व उमेदवार उभे करून पक्षाला बळकटी देण्यासाठी निवडणुक रिंगणात उतरणार असल्याची माहिती बसपा नेते गणेश राऊत यांनी दिली आहे.
       हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुक बसपा कडून गणेश राऊत यांनी लढविली होती त्याबरोबरच गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत देखील सरसम गटात राऊत यांनी निवडणूक लढविली होती याबरोबरच पंचायत समिती गणात देखील उमेदवार उभे करून मताधिक्य मिळवले होते.
     यावेळी देखील बसपा स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरणार असुन जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत च्या जागेवर उमेदवार उभे करणार असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधी गठाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील बसपा कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन बसपा नेते गणेश राऊत डोल्हारीकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.