कामारवाडी ग्रामपंचायत च्या अपहाराची चौकशी समिती मार्फत करणार गटविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यातील मौजे कामारवाडी येथील 15 वित्त आयोगाच्या निधीतून कुठल्याही प्रकारचे काम न करता सरपंच ग्रामसेवक यांनी संगनमताने एका एजन्सीच्या नावाने परस्पर बिले उचलून अपहार केला असुन याची चौकशी करण्याची मागणी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती परंतु या प्रकरणाकडे पं.स.च्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला असल्यामुळे सोमवार पासून कामारवाडी येथील नागरिकांनी पं.स.कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती मंगळवारी एका शिष्टमंडळाने या उपोषणाला भेट घेतली उपोषण कर्त्यांच्या मागण्या बाबतीत गटविकास अधिकाऱ्यांना पथक नेमणूक करण्याचे सांगून गटविकास अधिकाऱ्यांच्या एका पत्राद्वारे सदरील उपोषण मागे घेण्यात आले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी गावातील विकासकामे करण्यासाठी 15 वित्त आयोगाच्या निधीची उधळपट्टी करून कुठल्याही प्रकारची कामे न करताच गावातील विकासकामे करण्यासाठी आलेल्या निधीची परस्पर विल्हेवाट लावली असल्याची तक्रार केली त्यानंतर सोमवार पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.

या अपहार प्रकरणी चौकशी पथक नेमण्यात आले असुन सहाय्यक गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव यांची चौकशी पथक प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली दहा दिवसांच्या आत चौकशी अहवाल सादर करणे बाबत आदेशीत करण्यात आले असुन चौकशी अंती कार्यावही करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी नारवटकर यांनी पत्राद्वारे उपोषण करत्यांना कळविले या प्रशासनाच्या आश्वासनानंतर सदरील आमरण उपोषण मंगळवारी सायंकाळी उशीरा मागे घेण्यात आले यावेळी उपोषण कर्ते रामराव मनमंदे यांना माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड , कांग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, शिवसेना उबाठा तालुका प्रमुख संजय काईतवाड,प्रहारचे गजानन ठाकरे यांच्या उपस्थितीत पाणी पाजवून मागे घेण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.