हिमायतनगर येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात संपन्न..!
हिमायतनगर : हिमायतनगर येथील नालंदा बुद्ध विहारामध्ये 69 वा धम्मचक्र प्रवर्तदीन सोहळा उत्साहात संपन्न झाला,
यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकारी समवेत बौद्ध उपासक आणि उपासिका यांची उपस्थिती लक्षणीय होती.
सकाळच्या प्रारंभिक सत्रात धम्म ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केली, प्रमुख वक्ते म्हणून हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.संघपाल इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले
तसेच विज्ञानवादी बौद्ध धर्माची नियमावली या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी माजी मुख्याध्यापक सुरेश गडपाळे, सहशिक्षक शिवाजी कदम, प्रताप लोकडे, एम.यू हनवते, गोविंद कांबळे, संजय वाघमारे, चंद्रकांत हनवते, संदीप कदम, अशोक हनवते सर, एडवोकेट प्रदीप हनवते, रोकडे सर, पवार सर, राजू सोनसळे , राहुल भरणे, भीमराव राऊत, छायाताई उंमरे, सचिन घुले, बळीराम हनवते, स्वप्निल हनवते ,पिनू पाईकराव, ऋषिकेश कदम, आशिक भवरे, सुरेश लोखंडे,अमोल भगत, यांच्यासह असंख्य बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती.
