दिपावली निमित्त माजी आमदार जवळगावकरांच्या हिमायतनगर शहरात भेटी
हिमायतनगर प्रतिनिधी \ हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील जनतेचा विश्वास प्रेम जवळगावकर कुटुंबियावर कायम आहे त्यामुळे मी पदावर असो अथवा नसो माजी जनताच माझ सर्वस्व असुन जनतेच्या सुख दुःखात शेवटच्या श्वासापर्यंत असणार आहे कारण या तालुक्यातील जनतेनी आजपर्यंत दाखवलेला विश्वास प्रेम कदापि विसरणार नाही अशी भावना हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे लोकनेते माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यक्त केले.
शहरात भेटी गाठी दरम्यान माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा ठिकठिकाणी शाल,हार देऊन भव्य सत्कार केला व पुडील कार्यासाठी शुभेच्या दिल्या आणि येणाऱ्या काळात या शहराच्या विकासासाठी तुमची गरज असल्याची भावना व्यापारी बांधवानी जवळगावकरांकडे व्यक्त केली.
या प्रसंगी माजी आमदार जवळगावकर बोलताना म्हणाले कि मला हे शहर व ग्रामीण भागातील जनता माझ्यासाठी महत्वाची आहे जनतेच्या कुठल्याही अडी अडचणी असलेल्या सांगत चला मी तुमच्या करीता सदैव सोबत राहणार आहे. निवडणूका येत जात असतात परंतु तुम्ही माझ्यावर आजपर्यंत प्रेम , विश्वास जवळगावकर घराण्यावर दाखवला तो अनमोल असुन नागरिकांसह व्यापारी बांधवानी आपल्या समस्या थेट सांगत चला त्या सोडवण्याचे काम मी करत राहणार आहे . नागरिकांनी माझ्यावर दाखवलेले प्रेम कदापी विसरणार नाही असेही जवळगावकर म्हणाले .या प्रसंगी तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी,माजी जी प सदस्य सुभाष राठोड, सभापती जनार्दन ताडेवाड, माजी संचालक गणेश शिंदे शहराध्यक्ष संजय माने,शिवाजी पाटील ; माजी जी प सदस्य समद खान ' शेख रफिक सेट , माजी नगराध्यक्ष अखिल भाई , ज्ञानेश्वर शिंदे ' शामभाऊ ढगे, सुभाष शिंदे,अ. बाकी .,बाळू पाटील, संजय पाटील दुधडकर, संतोष आंबेकर,अनिल पाटील,रोशन धनवे ,दिपक कात्रे,खालीद भाई,पंढीत ढोणे, दत्तात्रय तिम्मापुरे, यांच्यासह कांग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
