हिमायतनगर शहराच्या विकासासाठी नगरपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकवा— शिवसेना उपनेते तथा आमदार हेमंत पाटील



 इच्छुक कार्यकर्त्यांना आजपासूनच जनतेच्या गाठी भेठी घेऊन कामाला लागाण्याचे सुचना
हिमायतनगर प्रतिनिधी /- आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज असल्याचा विश्वास शिवसेना उपनेते तथा आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.शहरातील सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकाविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच मतदारांच्या गाठीभेटी घेत सक्रिय कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी बैठकीत केले.

ते म्हणाले, “शिवसेना ही सर्व जाती-धर्मांना समान न्याय देणारी संघटना आहे. हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी दिघे साहेब यांच्या विचारांवर चालणारी संघटना असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यमातून नगरविकास खात्याद्वारे हिमायतनगर शहराचा चेहरामोहरा बदलतील. जनतेने देखील आपल्या शहराचा विकास साधण्यासाठी खालपासून वरपर्यंत सत्ता एका हाती दिल्यास गावाचा कायापालट होईल.”

शिवसेनेने आगामी नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक गांभीर्याने घेतली असून, प्रत्येक वार्डात नागरिकांशी संवाद, अडचणींचा आढावा आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यासाठी तयारी सुरू करण्याचे निर्देश आमदार पाटील यांनी दिले. त्यांनी आमदार बाबुराव कदम कोहळीकर आणि जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांना स्पष्ट सूचना देताना सांगितले की, “वशिला वा शिफारस नको — जनतेत काम करणाऱ्यांचाच बायोडाटा घ्या आणि त्यांची कामगिरी तपासूनच उमेदवारी द्या.”

हिमायतनगर शहरातील श्री साई मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या कार्यकर्ता आढावा बैठकीत शेकडो इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून आपली तयारी दाखवली. शिफारसीला ऊत न देता, कामगिरीच्या आधारे उमेदवारी देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, माजी बांधकाम सभापती प्रताप देशमुख, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गंगाधर चाभरेकर, महिला जिल्हाप्रमुख शीतल भांगे, उपजिल्हा प्रमुख राजू पाटील भोयर, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, विजय वळसे पाटील, माजी नगरसेवक अन्वरखान, सदाशिव सातव,संतोष कदम, गजानन हरडपकर , ज्ञानेश्वर पूटेवाड,अन्य मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.