हिमायतनगर प्रतिनिधी/हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) तालुकाध्यक्षपदी वडगाव येथील वामनराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे, तर शहराध्यक्षपदी अमोल पाटील धुमाळे यांची निवड करण्यात आली आहे. नुकतेच वरिष्ठांकडून या दोघांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे.
वामनराव पाटील यांनी अल्पावधीतच पक्ष संघटनेत सक्रियपणे काम करत वरिष्ठांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही निवड येत्या नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची मानली जात आहे.
दरम्यान, माजी तालुकाध्यक्ष अभिषेक लूटे यांना वरिष्ठ पदावर बढती देण्यात आली असून, जिल्हा कमिटीमध्ये त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
वामनराव पाटील आणि अमोल धुमाळे यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि शुभेच्छुकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
