भारतीय वृत्तपत्र दिनानिमित्त माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते वृत्तपत्र विक्रेता केदार ताटेवाड यांचा सत्कार

हिमायतनगर प्रतिनिधी \ भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त बुधवारी माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते वृतपत्र विक्रेते केदार ताटेवाड यांचा सत्कार करण्यात आला आहे.
हिमायतनगर शहरापासून पाच कि.मी.असलेल्या कार्ला गावचे रहिवासी केदार ताटेवाड हे ऊन पावसाळा हिवाळा या दिवसात दररोज सकाळी चार वाजता गावातून सायकल प्रवास करीत दररोज हिमायतनगर शहरात सर्व वर्तमानपत्र घरोघरी पोहोच करीत असतात गेल्या पाच ते सात वर्षापासून केदार ताटेवाड यांनी मेहनत करीत हा वर्तमानपत्र व्यवसाय वाढवला आहे. सर्वच वृत्तपत्र त्यांच्याकडून शहरात पोहच केल्या जातात.बुधवारी माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांच्या उपस्थित वृत्तपत्र विक्रेता केदार ताटेवाड यांचा वृत्तपत्र विक्रेता दिनाचे साधून माजी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी सत्कार केला.ग्रामीण भागातून दररोज वृत्तपत्र वाटप करण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणाचा आदर्श घेण्यासारखा असल्याचे माजी आ.जवळगावकर म्हणाले यावेळी माजी संचालक शेख रफिक भाई ,सभापती जनार्दन ताडेवाड ,माजी नगरसेवक अखिल भाई ,माजी सभापती प्रकाश वानखेडे , ज्ञानेश्वर शिंदे ,फेरोज खान ,संजय माने ,शेख रहिम,दत्तात्रय तिम्मापुरे, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड,अनिल मादसवार ,मारोती वाडेकर ,नागेश शिंदे , धम्मपाल मुन्नेश्वर,सोपान बोम्पीलवार ,मनानभाई,दत्त पुपलवाड , माधव यमजलवाड ,यांच्यासह पदाधीकारी उपस्तित होते ,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.