कारला जिल्हा परिषद शाळेतील सेवा गावकऱ्यांचे प्रेम विसरणार नाही - मुख्याध्यापक गंगाधर जाधव


हिमायतनगर प्रतिनिधी / कार्ला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर जाधव यांची भोकर तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेला बदली तर शिक्षिका इंदिरा पेंटेवाड  यांची पळसपूर येथे बदली झाली .त्यांनी गेल्या पाच ते सात वर्षापासून कारला जिल्हा परिषद शाळेला कार्यरत होते त्यांच्या बदली नंतर गावकऱ्यांनी सत्कार करून निरोप दिला आहे.

  कारला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सात वर्ग असुन विद्यार्थी संख्या देखील सध्यस्थीत चांगली आहे.या शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर जाधव यांची बदली झाल्यानंतर त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांचा मंगळवारी गावकऱ्यांनी सत्कार केला व निरोप दिला.या निरोप सत्कार प्रसंगी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सेवा देताना अनेक अडचणी करता सामोरे जावे लागते
        परंतु माझ्या सेवेत कारला गाव व गावातील नागरिकांनी अतिशय नम्रता ठेऊन शिक्षकांना शालेय व्यवस्थापन विद्यार्थ्यांना पाहिजे ती मदत केली जिल्हा परिषद शाळा सुजलाम सुफलाम करण्यासाठी ग्रामपंचायत ने पुढाकार घेतला त्यामुळे शाळेचा परिसर देखील चांगला रम्य बनला आहे ,गाव आणि शाळा सोडताना दुःख तर आहे एकीकडे आंनद आहे परंतु या गावातील नागरिकांचे हे प्रेम माया आपूलकीचा ठेवा स्मरणात राहण्याजोगा आहे तो कदापि विसरू शकणार नाही असे उदगार मुख्याध्यापक जाधव यांनी व्यक्त केले. व गंगाधर जाधव व शिक्षीका इंदिरा पेंटेवाड यांचा भव्य सत्कार करून निरोप दिला.यावेळी तंटामुक्त अध्यक्ष डॉ .गफार कार्लेकर ,पोलीस पाटील साईनाथ कोथळकर , मुख्याध्यापक आशाताई गोयले,अंगणवाडी कर्मचारी रजंना गड्डमवाड, विमलबाई गोखले,बालाजी मोरे ,राजेश ढाणके, संजय गोखले, रामराव पाटील,विठ्ठल सूर्यवंशी ,शिक्षक शुभम धनुस्कार ,सौ.शिनगारे, लक्ष्मण ढाणके, उत्तम कांबळे, शिवाजी गारसेटवाड,विश्वास घोडगे, बालाजी कांबळे,पवन इटेवाड,गावकरी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.