हिमायतनगर श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या उपाध्यक्ष व सचिव पदांची फेरनिवड उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ तसेच सचिव अनंता देवकते यांची सर्वानुमते पुनर्नियुक्ती

 


हिमायतनगर प्रतिनिधी /[शिरिनिवास बोम्पीलवार ]
येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वार्षिक बैठकीत उपाध्यक्ष आणि सचिव या पदांवर फेरनिवडीचा कार्यक्रम तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ तसेच सचिव म्हणून अनंता देवकते यांची सर्वानुमते पुनर्नियुक्ती करण्यात आली. निवडींनंतर स्वागत करून अनेकांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मागील अनेक वर्षांपासून येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचा कारभार प्रसिद्ध व्यापारी श्री महाविरचंद श्रीश्रीमाळ हे सांभाळत आहेत. त्यांच्या कुशल कार्यशैलीमुळे श्री परमेश्वर मंदिराचा कायापालट होऊन उत्पन्नात मोठी भर पडली आहे. येथील मंदिराचा कारभार धर्मदाय आयुक्तांच्या निगराणीखाली तहसीलदार यांच्या अध्यक्षेतेखाली चालविला जात आहे. दर तीन वर्षाला मंदिराचे उपाध्यक्ष व सेक्रेटरी पदाची निवड केली जाते. यंदाही तीन वर्षाचा कार्यकाळ संपल्याने श्री परमेश्वर मंदिरात दिनांक १४ मंगळवारी संचालक मंडळींची वार्षिक बैठक तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी सर्वानुमते गेल्या अनेक वर्षांपासून पारदर्शकतेत कारभार चालविणारे प्रतिष्ठित व्यापारी महाविरचंद श्रीश्रीमाळ यांची उपाध्यक्ष म्हणून तर अनंता देवकते यांची सेक्रेटरी म्हणून पुनर्निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मंदिर कमिटीच्या वतीने अध्यक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर, मंदिराचे जेष्ठ संचालक प्रकाश कोमावार, प्रकाश शिंदे, यांनी शॉल पुष्पहार अर्पण करून अभिनंदन केले. निवड प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात आणि सर्व सदस्यांच्या सहमतीने बिनविरोध पूर्ण झाली. नवीन फेरनिवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे सदस्यांनी स्वागत करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी वामनराव बनसोडे, लताबाई मुलंगे, राजाराम झरेवाड, मथुराबाई भोयर, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, गजानन मुत्तलवाड, विलास वानखेडे, लिपिक बाबुराव भोयर, प्रकाश साभळकर, देवराव वाडेकर आदींसह अनेकांची उपस्थिती होती. दरम्यान निवडीबद्दल हिमायतनगरचे माजी नगराध्यक्ष कुणाल  राठोड यांनी देखील शाल पुष्पहार आणि पेढा भरवून उपाध्यक्ष व सेक्रेटरी यांचा स्वागत करत पुढील कार्यासाठी करत शुभेच्छा दिल्या.

बैठकीदरम्यान ट्रस्टच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी महसूल विभागातील अतिवृष्टीच्या काळातील कामकाज पारदर्शकपणे आणि कार्यक्षमतेने पार पाडल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. महसूल क्षेत्रातील भरीव आणि लोकाभिमुख कामगिरीची उपस्थित सदस्यांनी दखल घेत प्रशंसात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.